घोटगे सोनवडे रस्त्याचा स्टेज २ चा प्रश्न मार्गी

308
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभव नाईक:मोदींच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत होणार निश्चीती

कणकवली, ता.१६ : कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणाऱ्या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला लागणारी वन्यजीव विभाग स्टेज २ ची परवानगी दिल्ली येथे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पर्यावरण व वनविभागाच्या बैठकीत निश्चित होणार आहे. तसेच घोटगे सोनवडे घाट रस्त्याचे रत्नागिरी व कोल्हापुर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले काम एकत्र करण्यासाठी विशेष एक्झिकेटिव्ह इंजिनिअर तुषार बुरुड यांची नेमणूक मुंबई येथे झालेल्या घोटगे सोनवडे घाट रस्त्यासंदर्भातील झालेल्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
घोटगे सोनवडे घाट रस्त्याबाबत मुंबई मंत्रालयात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक,आमदार सदानंद चव्हाण, आमदार प्रकाश आबिटकर, अतुल काळसेकर, राजन तेली, अतुल रावराणे, संदेश पारकर, वनविभाग सचिव विकास खार्गे, सा. बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी, व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत घोटगे सोनवडे घाट रस्त्यासाठी वन्यजीव विभागाच्या स्टेज २ ची परवानगी आवश्यक असून हि परवानगी लवकरच दिल्ली येथे पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही बैठक चंद्रकांत पाटील, खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आली आहे. तसेच घोटगे सोनवडे घाट रस्त्याचे काम रत्नागिरी व कोल्हापुर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निम्मे निम्मे असून हे एकत्र करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली. त्यानुसार हे काम एकत्र करण्यासाठी विशेष एक्झिकेटिव्ह इंजिनिअर नेमण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार विशेष एक्झिकेटिव्ह इंजिनिअर तुषार बुरुड यांची नेमणूक करण्यात आली. त्याच प्रमाणे या घाट रत्स्यसाठी पूर्वीची जी अलाइनमेंट केली आहे तीच अलाइनमेंट निश्चित करण्यात आली. या रस्त्यासाठी आवश्यक निधी तात्काळ देणार असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले आहे.
या रस्त्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून वर्किंग परमिशन मिळाली आहे. त्याचं प्रमाणे इतर परवानग्या मिळविण्यासाठी ना. चंद्रकांत पाटील व खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

\