देवघर मध्यम प्रकल्पातून ३४.७७ घ.मी. प्रतिसेकंद विसर्ग सुरू

180
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.१७: कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२.०० टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७घ.मी. प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६०.७७४० द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ८४.४० मि.मी. इतका पाऊस झाला असून १९४०.३० मि.मी. इतका एकूण पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ४०.८५ टक्के पाणीसाठा झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २०२०.२० मि.मी एकूण पाऊस झाला आहे.
नाधवडे, सनमटेंब आणि तिथवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून त्यांचा पाणीसाठा अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. नाधवडे ९७.९२ टक्के, सनमटेंब – ९५.८२ टक्के आणि तिथवली – ८०.६२ टक्के आहे. ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पातून १८.५९घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७५.७८ टक्के भरला असून धरणात सध्या ३३९.००८० द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २७.४० मि.मी पाऊस झाला असून १८९९.६०मि.मी. एकूण पाऊस झाला आहे.

\