चिंदर गावची गावपळण १८ नोव्हेंबरपासून…

2

ग्रामदेवतेने दिला कौल ; गाव बनणार निर्मनुष्य…

आचरा, ता. ०८ : बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण १८ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. आज सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण १८ पासून होणार असल्याची माहिती चिंदर गावचे मानकरी आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे, भाई तावडे यांनी दिली.
सुमारे चार ते पाच हजार वस्तीच्या या गावात प्राचीन काळापासून दर तीन ते पाच वर्षांनी गावपळणीची प्रथा पाळली जात आहे. मागील काळात २०१८ साली गावपण झाली होती. यंदाचे वर्ष गावपळणीचे असल्याने प्रथेप्रमाणे आज बारा पाच मानकरी जमून श्री देव रवळनाथाला कौल प्रसाद घेतला. देवाचा कौल झाल्यावर तारीख निश्चित करण्यात आली. यामुळे १८ नोव्हेंबर पासून २१ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण चिंदर गावांतील माणसे तीन दिवस आणि तीन रात्री साठी वेशीबाहेर निसर्गाच्या सानिध्यात वस्ती करून राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण चिंदर गाव निर्मनुष्य होणार आहे आणि गजबज वाढणार आहे ती गावच्या वशीबाहेर. यासाठी मुंबई चाकरमानी ही मोठ्या संख्येने या पळणीत सहभागी होणार आहेत.

286

4