पुणे येथील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कुटीर रुग्णालयाचा विकास…

182
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर: सावंतवाडीत रक्तदान व आरोग्य शिबिराचा शुभारंभ…

सावंतवाडी ता.१७: पुणे येथील ससून हॉस्पिटलच्या धर्तीवर येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट होणार आहे.त्यासाठी डिस्ट्रीक मिनरल फंड मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल,येत्या महीन्याभरात शुशोभिकरणाच्या या कामाला सुरवात होणार आहे.अशी माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिली.पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर तसेच तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यांचे उद्घाटन श्री.केसरकर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.त्याच्यासोबत यावेळी रुग्णालय अधिक्षक उत्तम पाटील उपस्थित होते.
श्री.केसरकर बोलतांना म्हणाले,जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,त्यादृष्ठी पाऊले उचलण्यात आली आहेत.येथील उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती पाहता येत्या महिन्याभरात शुशोभिकरणाचे काम हाती घेतले जाईल यात खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णालयाचा कायापालट होणार आहे. पुणे येथील ससुन हाॅस्पीटलचा कायापालटही अशाच पध्दतीने झाला आहे.जिल्ह्याचे सीव्हील सर्जन व मी स्वतः या रुग्णालयाची पाहणी केली असून खासगी रुग्णालयातील सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.याठिकाठी शंभर खाटांचे मल्टीस्पेशालिस्ट हाॅस्पिटलही उभारले जाणार आहे, हे हाॅस्पिटल चारमजली असुन पहील्या मजल्यावर हाॅर्ट सर्जरी,दुसर्या मजल्यावर एॅक्नोलाॅजी,तिसर्या मजल्यावर नारोलाॅजी तर चौथ्या मजल्यावर युरोलाॅजी विभाग असणार त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेत आमुलाग्रह बदल होणार आहेत.

\