देवेंद्र फडणवीस आणि राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन…
वेंगुर्ले ता.१७: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२० ते २२ जुलै रोजी तालुका भाजपच्या वतीने महिलांसाठी मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही प्रशिक्षण कार्यशाळा येथील स्वामिनी मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गामध्ये गणपतीसाठी लागणारी कापसाची वस्त्रे आणि आकर्षक हार बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.हे प्रशिक्षण देण्यासाठी चिपळूण येथील प्रसिद्ध उमा फॅशन इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक येणार आहेत.यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी प्रकश धावडे ९४०४९५७९९०,सुषमा खानोलकर ९४०४१६३५७४,श्रेया मयेकर ९१५६४२५०१३,साक्षी पेडणेकर ९४२१०३३६७८,वृंदा गवंडळकर ९८२३११८७७८ या नंबर वर संपर्क साधावा.