सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या

2

सिंधुदुर्गनगरी,ता.१७: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमीत गोयल यांची मुंबई येथे तर कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची पदोन्नतीने जळगाव पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली आहे. तर जिल्ह्याच्या नव्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर पुणे येथील तुषार पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील ३७ पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिका-यांच्या बदल्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी केल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन अधिका-यांचा समावेश आहे. वर्ष भरापूर्वीच निमित गोयल व सात महिन्यापूर्वी भागश्री नवटके यांची सिंधुदुर्गात बदली झाली होती. या दोन्ही अधिका-यांचा जिल्ह्यात कर्तव्य निष्ठ पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक होता. निमीत गोयल यांची मुंबई येथे समादेशक, राज्य राखीव व पोलीस दलात तर त्यांच्या जागी पुणे येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची नियुक्ती झाली आहे. झाली भाग्यश्री नवटके यांची पदोन्नतीने जळगाव अपर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. तर त्यांच्या जागी अजुनही कोणत्याही अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

2

4