दोडामार्ग /सुमित दळवी,ता.१७ :हेवाळे आयनोडे या ग्रामपंचायतीवर अखेर आज अश्विनी जाधव यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली आज सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार श्री ओंकार ओतारी यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली सकाळी ग्रामपंचायत मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली हे पद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होते या ग्रामपंचायत मध्ये अश्विनी जाधव यांनी अ.जा.ज मधुन अर्ज दाखल दाखल केला होता. त्यामुळे त्या आज बिनविरोध म्हणून निवडून आल्या यावेळी प्रभारी सरपंच संदीप देसाई सदस्य सुनील सुतार बाई सुतार सीमा देसाई दौलतराव राणे युवा सेना तालुका समन्वयक श्री मदन राणे उदय जाधव संदेश राणे सुरज राणे प्रदीप गावडे विजय जाधव अमर जाधव योगेश राणे जयवंतराव देसाई विठ्ठल देसाई सुभाष देसाई प्रदीप गावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर स्नेह रेसिडेन्सी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्याला या आरक्षणामुळेच सरपंच पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला याचे सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांना जाते गावच्या विकास कामात या सर्व लोकांच्या मदतीने प्रगतीपथावर नेऊ असे नवनिर्वाचित सरपंच अश्विनी जाधव म्हणाल्या. तर या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच विराजमान होण्यास मोलाची कामगिरी बजावणाऱ्या युवा सेना तालुका समन्वयक श्री मदन राणे यांनी अश्विनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली व सर्व सदस्य ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायतीची विकासात्मक घोडदौड यापुढे अविरत सुरू राहील असे सांगितले यावेळी सरपंच अश्विनी जाधव यांचे अनेकांनी प्रत्यक्ष येऊन अभिनंदन केले यात दोडामार्ग तालुका विकास मंचाचे श्री आनंद तळणकर यांनी अश्विनी जाधव यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेवाळे आयनोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी जाधव बिनविरोध
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES