शिवसेनेच्या प्रणाली सावंत यांचा ५ मतांनी केला पराभव
मालवण, ता. १७ : खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या साबाजी सावंत यांनी ५ मतांनी विजय मिळविला.
सरपंच अमिता नाईक यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी २ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. स्वाभीमान पक्षाकडून साबाजी सावंत तर शिवसेनेच्या प्रणाली सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात साबाजी सावंत याना ८ तर प्रणाली सावंत याना ३ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत सरपंच म्हणून स्वाभिमानचे साबाजी सावंत विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी के. टी. पाताडे यांनी जाहीर केले.
नवनिर्वाचित सरपंच साबाजी सावंत यांचे महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपसरपंच रविंद्र गावडे, दीपा सावंत, विभागीय अध्यक्ष आतिक शेख, माजी महिला बालकल्याण सभापती श्रावणी नाईक, अरुणा सावंत, शेखर फोंडेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक, श्वेता फोंडेकर, अमिता नाईक, प्रचिता पराडकर, रेश्मा घोगळे, विशाखा पेंडूरकर, आप्पा सावंत, अमित सावंत, सुमित सावंत, अजित सावंत, न्हानू पेंडूरकर, धाकोजी सावंत, विजय सावंत, सत्यविजय सावंत, रवी आजगावकर, सत्यवान परब, संजय पेंडूरकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच साबाजी सावंत यांना पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
गावातून तब्बल ८० वर्षानंतर खरारेवाडीला अशाप्रकारे निवडणूक घेऊन सरपंच पदाचा मान मिळाला आहे. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात विकासात्मक गोष्टीना प्राधान्य दिले जाईल असे नवनिर्वाचित सरपंच श्री. सावंत यांनी सांगितले.