Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याना.दिपकभाई केसरकर...सिंधदुर्ग जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा!

ना.दिपकभाई केसरकर…सिंधदुर्ग जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा!

ले.मिलिंद प्रभु,बांदिवडे

सद्ध्या मुक्काम न्यूयाॅर्क

प्रगतशिल मिरी उत्पादक बागायतदार

देशपातळीवर सिंधदुर्ग जिल्ह्याचा सुसंस्कृतपणा नेउन ठेवणारे लोकप्रतीनिधी म्हणुन पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री बनल्या नंतर कधीही आला नसेल इतका निधी जिल्ह्यात आला हे कुणीही नाकारु शकत नाही. महत्वाकांक्षी अशा चांदा ते बांदा या योजनेतुन जिल्ह्यातील प्रत्येक घराला रोजगार मिळावा या अपेक्षेने विविध योजना नागरीकांसाठी राबविल्या जात आहेत.
निसर्गताच लाभलेली प्रतिभा आणि काळाच्या पलीकडे पाहण्याचे असलेले व्हीजन, कामाचा प्रचंड उरक या गुणांमुळे त्यांचे व्यक्तित्व आणि कार्य जनमानसात तळपुन दिसते. सधन कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा तळागाळातील दीन दलित, उपेक्षित गोरगरिबांबद्दल ह्दयात पराकोटीची करुणा जतन करणारा हा नेता जिल्ह्याला लाभला आहे.

सिंधुदुर्गला व इथल्या गोरगरीब जनतेला शेतकºयाना, बागायतदाराना, पर्यटनाच्या माध्यमातुन विकासाची आस घेतलेल्या तरुणाना न्याय मिळु शकेल याची खात्री भाईना आहे. राजकारणात निर्माण होणारा ताण आणि तणाव याना सामोरे जात या सर्वांचा समतोल कधीच त्यानी ढळु दिला नाही. सावंतवाडी शहराच्या सर्वांगिण विकासाच्या कार्याच्या बळावर जनमानसावर असलेला प्रभाव आणि त्यानंतर सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये जनसंपर्क वाढवून आणि विकासाच्या कामात पूढाकार घेऊन आमदारकीचा आपला हक्क त्यानी सिद्ध केला आहे. घराण्याची दानशुरपणाची परंपरा आजही त्यानी जपली आहे.

केवळ अतिमहत्वाकांक्षी होऊन राजकारणाचा व्यवसाय झालेल्या आजच्या काळात  भार्इंसारखा नेता दुर्मिळच म्हणावा लागेल.
स्वप्नातील कोकण प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य भार्इंच्या व्ह७ीजन नुसार सत्यात येत आहे.

चांदा ते बांदा ही योजना जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे. शेती, मत्स आणि पर्यटन या माध्यमातुन काम करणाºया जिल्ह्यातील बांधवाना आर्थिक सहकार्याचा हात या योजनेतुन मिळु लागल्याने लक्ष्मी हाती खेळु लागली आहे. जनतेने सकारात्मक प्रतीसाद देऊन अनेक योजनांचा लाभ घेतल्यास येथील अर्थकारण निश्चित बदलणार आहे. येथील निसर्गाचा आनंद देताना पर्यटनाकडे व्यावसाईक दृष्ट्या पाहीले जाऊ लागले आहे.

या योजनेच्या जिल्हास्तरीय समीती वर सदस्य म्हणुन नियुक्ति देताना अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्ती देताना सुद्धा कृषी क्षेत्रातच काम करणाºया व्यक्ति आपण निवडल्या. मीरी लागवड व मसाला पीकातुन आर्थिक स्तर उंचावू शकतो हे सर्वाना समजावे यासाठी भाईनी बांदिवडे येथे मिरी महोत्सव आयोजीत करत शेतकºयाना प्रगतीचा मार्ग दाखविला.
जिल्ह्याला विकासात पुढे नेताना विरोध होणार ही जाणीव सुद्धा भाईना आहे. परंतु विरोधकाना उत्तर देत बसण्यापेक्षा आपल्या कामाच्या कृतीतुन दीपक भाई पलटवार करतात.

राज्याचे अर्थ, नियोजन आणि गृहराज्य मंत्री म्हणुन तुमच्या कार्याची दखल संपुर्ण राज्याने घेतली आहे. आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारच्या जबाबदाºया प्राप्त होऊन येथील जनतेच्या चेहºयावर आर्थिक सक्षमतेचे समाधान दिसावे हीच आपल्या वाढदीनी साई चरणी प्रार्थना!

कोकणातील श्रीमंतीचा वारसा राखून, शेती,मत्स्यपालन, पर्यटन, शिक्षण आणि उद्योग केंद्रित विकासासह उज्ज्वल कोकणचे स्वप्न आम्हा कोकावासीयांना दाखविणारे व ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करणारे शांतताप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय दीपक केसरकर (भाई). कोकणातील युवकाने शेती,मस्त्य,पर्यटन आणि उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय गंतव्य म्हणून विकसित होण्यासाठी आघाडी घेतली पाहिजे. आपले हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण आपले पर्यावरणाचे संतुलन कायम राखले पाहिजे अशा मताचे सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व चांदा ते बांदा या समितीचे अध्यक्ष
म्हणून आपण नेहमीच आघाडीवर राहून कोकणचे नेतृत्व केले आहे व यापुढे ही कराल.

आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व येथील शेतकऱ्यांच्या उत्कर्षांसाठी कायम झटत आला आहात. चांदा ते बांदा ह्या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी व पथदर्शी योजने अंतर्गत सदर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरावर नेहमीच लोकांना प्रेरणा देत आला आहात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments