सिंधुदुर्गसह चार जिल्ह्यातील मत्स विभागातील रिक्त पदे तात्काळ भरणार

2

महादेव जानकर:राणेंना सभागृहात योग्य ते उत्तर दिले

सावंतवाडी,ता.१८: सिंधुदुर्गसह चार जिल्ह्यातील मत्स विभागातील रिक्त पदे येत्या आठवड्याभरात भरण्यात येणार आहे. एलईडीच्या विरोधात शासनाची भूमिका आहे. त्यामुळे आता मच्छीमारांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास राज्याचे मत्स व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिली.
श्री जानकर यांनी आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात भेट देवून श्री केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पत्रकारांशी श्री जानकर यांनी संवाद साधला.
यावेळी श्री जानकर म्हणाले मी पदभार घेतल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक वर्षे मत्स आणि पशुसंवर्धन विभागात भरती झाली नव्हती ती आता होणार आहे.यात सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड आणि पालघर या चार जिल्ह्याचा समावेश आहे.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टिकेबाबत ते म्हणाले मी सर्व सामान्य कुटंबातील आहे. राणेंनी केलेल्या टिकेला मी सभागृहात उत्तर दिले त्यामुळे या विषयावर आता काही बोलणार नाही.यावेळी आमदार वैभव नाईक,राजन पोकळे उपस्थित होते.

4