नाथ गोसावी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल गोसावी यांची निवड…

188
2

मालवण, ता. १८ : नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल गोसावी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आश्रमशाळा बोर्डवे येथे पार पडली. या सभेत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवडलेली उर्वरित कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष शांताराम गोसावी, सचिव- भालचंद्र गोसावी, खजिनदार -चंद्रसेन गोसावी, सहसचिव – सौ. वैशाली गोसावी, सहखजिनदार – सौ. राजलता गोसावी, सदस्य- संदीप गोसावी,  सौ. उर्मिला गोसावी, जयप्रकाश गोसावी, झिलु गोसावी, राजेंद्र गोसावी, रविंद्र  गोसावी, रमाकांत गोसावी, सल्लागार – योगेश गोसावी, जनार्दन गोसावी यांचा समावेश आहे.
यावेळी विद्यमान अध्यक्ष विठ्ठल गोसावी यांनी जिल्ह्यातील सर्व नाथपंथी गोसावी समाजाला एकत्र करणे, मंडळाचे सभासद वाढविण्यासाठी व विविध योजनांची माहिती, ज्ञातीबांधवापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आहे. स्वागत भालचंद्र गोसावी यांनी केले. संदीप गोसावी यांनी आभार मानले.

4