कणकवली विधानसभा भाजपाने लढवावी : संदेश पारकर

234
2
Google search engine
Google search engine
Google search engine

केसरकर कॅबिनेट मंत्री व्हावेत, व्यक्त केली इच्छा

सावंतवाडी,ता.१८: आगामी विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपा युती करून लढवाव्यात सावंतवाडीत दीपक केसरकर कुडाळमध्ये वैभव नाईक आहेत आणि कणकवली भाजपाने लढवावी अशी इच्छा व्यक्त करीत भविष्यात पालकमंत्री दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी युतीच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत असे आवाहन भाजपाचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज येथे केले.
पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची गंगा आली आहे. अनेक प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या दुरदृष्टीचा फायदा जिल्ह्यातील लोकांना होणार आहे असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पारकर म्हणाले आगामी काळात शिवसेना-भाजपा युती करून निवडणुका लढविण्यास याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. यात सावंतवाडीची जागा केसरकर यांच्यासाठी कुडाळची जागा वैभव नाईक यांच्यासाठी तर कणकवली मतदारसंघाची जागा भाजपने लढवावी असे त्यात म्हटले. दोघेही युती करून निवडणुकीला सामोरे गेलो तर देशात ज्याप्रमाणे सत्ता आहे त्याप्रमाणे राज्यात शिवसेना-भाजप सत्ता येण्यास हरकत नाही असाही विश्वास व्यक्त केला.
त्यांनी यावेळी पालकमंत्री केसरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या कामाची पद्धत लोकांची असलेल्या संपर्क याचा फायदा युतीला झाला आहे आणि त्या माध्यमातून केसरकर अनेक वर्षे रेंगाळलेले महामार्गाचा प्रश्न विमानतळाचा प्रश्न सोडवू शकले. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

\