वेंगुर्ले लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रार्थना हळदणकर तर सचिवपदी स्मिता डुबळे यांची निवड

218
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नुतन कार्यकारिणीचा उद्या पदग्रहण सोहळा

वेंगुर्ले, ता.१८ : वेंगुर्ले लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी सौ. प्रार्थना पुंडलीक हळदणकर यांची तर उपाध्यक्षपदी सौ. मंदाकीनी सामंत, सचिवपदी सौ. स्मिता डुबळे तर खजिनदार पदी सौ. कविता भाटीया यांची निवड करण्यात आली आहे. नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उद्या शुक्रवार १९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
वेंगुर्ले लायनेस क्लबच्या नुतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा स्वामिनी मंगल कार्यालय येथे उद्या सायंकाळी ५.३० वाजता शपथप्रधान अधिकारी लायनेस सौ. सुनेत्रा फाटक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरम्यान वेंगुर्ले लायनेस ची सभा नुकतीच क्लबच्या विद्यमान अध्यक्षा सौ. प्राची मणचेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात उपसचिव सौ. सुक्ष्मा प्रभूखानोलकर, पी.आर.ओ. सौ. हेमा गावस्कर, टेल टिस्टर सौ. दिशा कर्पे, टेमर सौ. बीना भाटीया, डायरेक्टर नीला यरनाळकर, प्राची मणचेकर, अंजली धुरी, उर्मिला सावंत, शर्मिला मठकर, श्रध्दा बोवलेकर, डॉ. वसुधा मोरे, स्मिता कोयंडे आदिंची निवड करण्यात आली. तरी शपथग्रहण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लायनेस प्राची मणचेकर यांनी केले आहे.

\