वेंगुर्ले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

2

 

वेंगुर्ले, ता.१८ : परमेश्वराने आपले अस्तीत्व म्हणून आपण प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिल व शिक्षक तसेच प्रत्येक कामात चांगली शिकवण देणारा तो आपलाा गुरु होय असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या प्रगती चव्हाण यांनी केले. वेंगुर्ले येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
कोकण एज्युकेशन सोसायटी चे अ‍ॅड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे गुरुपौर्णिमे निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर प्राचार्य डॉ. के.जी. केळकर, उपप्राचार्य डॉ. पुजा कर्पे, डॉ. श्रीराम हेर्लेकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. तर मान्यवरांना वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कु. घाडी हिने गुरुंविषयी कृतज्ञतापर विचार मांडले. तर कु. दिक्षिता भांडे हिने स्वरचित कविता सादर केली. आणि कु. श्रृतीका कदम व फौजिया शेख या दोघींनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. केळकर म्हणाले की, कोणत्याही रुपात आपल्याला मार्ग दाखवणारा गुरु असु शकतो. मग तो आपला विद्यार्थीही असू शकतो असे म्हणत गुरु शिष्याचे नाते महत्वाचे ठरते असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रिया, डॉ. राखी माधव, डॉ. दिपाली देसाई, डॉ. सोनाली सावंत, डॉ. सिध्दी सावंत, डॉ. संजिव लिंगवत, डॉ. रविंद्र बुरुड, डॉ. रुपाली माळी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत बी.एच.एम.एस. च्या श्री. अपुर्व गिरी यांच्या हस्ते तर सुत्रसंचलन कु. पल्लवी कांबळे तर आभार डॉ. पुजा कर्पे यांनी मानले.

18

4