Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात बोजवारा

आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात बोजवारा

१ लाख ९५ हजार लाभार्थी असताना ११ हजार ५०० व्यक्तींच्या नोंदी

नोंदणी तात्काळ करण्याचे पात्र लाभार्थीना प्रशासानाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी ता.१८:
केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरित्या सुरु केलेल्या अतिमहत्त्वाच्या आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नोंदणीचा जिल्ह्यात पूर्णतःहा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी एक लाख ९५ हजार २८४ एवढे लाभार्थी पात्र असताना यासाठी आवश्यक असलेले ई-कार्ड घेण्यासाठी केवळ ११ हजार ५०० व्यक्तींनी नोंदणी केली आहे. याबाबत आता जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून नोंदणी तात्काळ होण्याकरिता ग्राम पंचायत स्तरावर यंत्रणा राबविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याकरिता पात्र लाभार्थीनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले.
याबाबत माहिती देण्यासाठी पराडकर यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे व अन्य उपस्थित होते.
गरीब रुग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने २३ सप्टेंबर २०१८ रोजी देशभरात हि योजना लागू झाली. यासाठी २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील कच्चे घर, प्रौढ व्यक्ती नसलेली, स्त्री कुटुंबप्रमुख, अनुसूचित जाती-जमाती, भूमिहीन मजूर हे निकष ग्रामीण भागासाठी तर शहरी भागासाठी कचरा वेचक, भिक्षुक, घरकाम करणारे, गटइ कामगार, फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लम्बर, गवंडी, रंगकाम, वेल्डर, सफाई कर्मचारी, माळीकाम करणारे, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक, मदतनीस, सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे, सहाय्यक, शिपाई, वेटर, वीजतंत्री, मेकांनीक आदी निकष लावून देशात १० कोटी कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात हा आकडा ८३ लाख ७२ हजार तर सिंधुदुर्गात ५३ हजार २५५ कुटुंबांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.
यावेळी बोलताना पराडकर यांनी योजना पूर्णपणे निशुल्क आहे. यात सांधे प्रत्यारोपणाचा समावेश आहे. पात्र कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. १२५० आजारांवर उपचार होणार आहेत. सिंधुदुर्गात जिल्हा रुग्णालय, पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल, कणकवली येथील नागवेकर हॉस्पिटल, बिरमोळे हॉस्पिटल, संजीवीनी तर सावंतवाडी येथील संजीवीनी बाल रुग्णालय हॉस्पिटल या दवाखान्याचा यात समावेश करण्यात आले आहे.
मात्र, यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये किंवा शासनाच्या ई-सेवा केंद्रावर हि नोंदणी तात्काळ करावयाची आहे. यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र-ड्राईव्हिंग लायसन – पॅनकार्ड यातील एक, तसेच १८ वर्षांखालील असल्यास ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला हि कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थी यादीच नसल्याने नोंदणी रखडली
केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची यादी जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहे. मात्र, हि यादी पीडीएफ असून ती ऑनलाईन उपलब्ध झाली आहे. ती ओपन करण्यासाठी प्रत्येक गावाला स्वतंत्र पासवर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे हि यादी ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध झालेली नाही. परिणामी पात्र लाभार्थीना आपण या लाभासाठी पात्र असल्याचे माहीत झालेले नाही. त्यामुळे नोंदणी रखडल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments