उत्पादन शुल्क विभागाची दारू वाहतुकीवर कारवाई :साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

2

बांदा/प्रतिनिधी
गोव्यातून आंबोली मार्गे कोल्हापूर येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुली येथील पथकाने कारवाई करीत १ लाख ३५ हजार ३६० रुपयांची दारूसह एकूण ४ लाख ४७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई सावंतवाडी आंबोली रोडवर सांगेली धवडकी तिठा येथे करण्यात आली.याप्रकरणी सुनील बंडा शिंदे(२४) कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण,दुय्यय निरीक्षक चंद्रकांत कदम,जवान रमेश चंदूरे, शरद साळुंखे, संदीप कदम यांनी केली.

1

4