सावंतवाडी वैश्यवाडा भागात घर कोसळून दोन कारचे नुकसान

2

सावंतवाडी, ता. 19 : येथील वैश्यवाडा परिसरातील अनंत पाटणकर यांचे घर कोसळल्यामुळे दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यात राकेश बांदेकर व गोविंद बांदेकर यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सावंतवाडीचे बांधकाम अभियंता तानाजी पालव उपस्थित होते.


संंबंधित पाटणकर यांचे घर बंदावस्थेत होते. गेली अनेक वर्षे ते बंद आहे. पाटणकर हे मुंबई येथे वास्तव्यास असतात. धोकादायक घराबाबत पालिकेकडून संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. परंतू कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती असे बांदेकर यांनी सांगितले. धोकादायक स्थितीत असलेले घर आता पुर्णतः पाडून टाकण्यात येईल असे पालिकेने सांगितले. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

14

4