नेहरू युवा केंद्राच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी निवड समितीवर अँड. सुषमा खानोलकर

2

वेंगुर्ले,ता.१९ : नेहरू युवा केंद्राच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी निवड समिती वर भाजपा वेंगुर्ले शहर अध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुका कार्यालयात भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वेंगुर्लेतील या कार्यक्रमा वेळी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, विस्तारक पंकज बुटाला, वाॅर रुमचे मयूर निकम, नगरसेवक सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व रविंद्र शिरसाठ, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, कमलाकांत प्रभु, तुळस शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, वायंगणी शक्ती केंद्र प्रमुख बाळु कोचरेकर, उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, बुथप्रमुख दादा तांडेल, प्रकाश धावडे आदी उपस्थित होते.

28

4