वेताळ प्रतिष्ठानचे स्वच्छता उपक्रमात मोलाचे योगदान

162
2

सरपंच शंकर घारे यांचे प्रतिपादन

वेंगुर्ले ता.१९:: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने सांस्कृतिक, कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असतात. शासनाच्या स्वच्छता अभियान अंतर्गत प्रतिष्ठानचे मागील महिनाभर अनेक स्वच्छता विषयक उपक्रम राबवत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असून आपल्या श्रमदानातून आणि जनजागृती उपक्रमातून स्वछता अभियानात अमूल्य योगदान देत आहेत असे प्रतिपादन सरपंच शंकर घारे यांनी केले.
शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप अभियान अंतर्गत श्रमदानातून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग संलग्न वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे आयोजित स्वच्छता विषयक जनजागृतीसाठी भित्तीपत्रक अनावरण कार्यक्रम वेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच जयवंत तुळसकर, श्री देवी सातेरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता पडवळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर,सचिव गुरुदास तिरोडकर, किरण सावंत,यशवंत सावंत,मंगेश सावंत,कुंदा सावंत, प्रेमा परब,वासुदेव वराडकर, सदाशिव सावंत,शुभम सावंत,कृष्णा सावंत,प्राची गोरे,निकिता सावंत,प्रशांत सावंत,वैभव होडावडेकर,समीर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने ग्रीष्मकालीन स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवडा उपक्रमात सहभागी होत श्रामदानातीन शाळांमध्ये स्वच्छता विषयक मार्गदर्शन वर्ग, रस्ता स्वच्छता, सार्वजनिक विहीर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, शाळांमध्ये शोष खड्डे निर्मिती, सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी स्वच्छता विषयक संदेश लेखन आशा अनेक कार्यक्रमातून स्वच्छता विषयक उपक्रम कौतुकास्पद आहे. असे सांगत सरपंच घारे यांनी प्रतिष्ठनच्या कार्याचे कौतुक केले.

4