गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात धावणार दोन हजार गाड्या…

528
2

मुंबई, ता.१९: गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी प्रशासनाकडून २२०० गाड्या कोकणात सोडण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २७ जुलैपासून याची ऑनलाइन बुकिंगची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे जाण्यास सोबत परतीच्या प्रवासाचे सुद्धा बुकिंग यावेळी घेण्यात येणार आहे असे राऊत यांनी यावेळी सांगितले त्यामुळे हा निर्णय कोकणात गणेशोत्सव येणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी दिलासा देणारा आहे.

4