विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कळणेच्या वतीने वृक्षारोपण

167
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग, ता.१९: बँक राष्ट्रीय करणाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा कळणे यांच्यावतीने नूतन विद्यालय कळणे या प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बँक जिल्हा विकास प्रबंधक पंकज धुरी यांनी बँक राष्ट्रीय करण म्हणजे काय याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच बँकेचे ग्रामीण भागातील योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले उद्योजक गणपत देसाई यांनी बँकेने वृक्षारोपणाचा राबवलेला उपक्रम हा पर्यावरण पूरक व कौतुकास्पद असल्याचे सांगितले यावेळी कळळे सरपंच सौ जानवी देसाई शाखा अधिकारी श्री कोठवले मुख्याध्यापक महेंद्र देसाई  शिक्षक सतीश धरणे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

\