साळेल नांगरभाट रस्त्यावर झाड कोसळले…

148
2

रस्त्यालगतची धोकादायक झाडे सा. बा. विभागाने तत्काळ हटवावीत…

मालवण, ता. १९ : साळेल नांगरभाट येथील पाझर तलावानजीक रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. रस्त्याच्या मधोमध झाड उन्मळून पडल्याने मालवण-कसाल मार्गावरील एकेरी वाहतूक सुरू होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. मालवण पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावर कोसळले झाड हटविण्याबाबत कळविले आहे.
दरम्यान आनंदव्हाळ ते कट्टा या १५ किलोमीटरच्या मार्गावर अनेक झाडे धोकादायक स्थितीत आहेत. धोकादायक झाडांनी यापूर्वी अनेकांचे बळी घेतले असल्याने बांधकाम विभागाने धोकादायक झाडे तत्काळ हटवावी, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे.

4