Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याविरार येथील अंगणवाडी शाळेमध्ये मनसे वैभववाडी तालुक्याच्या वतीने पंखा भेट

विरार येथील अंगणवाडी शाळेमध्ये मनसे वैभववाडी तालुक्याच्या वतीने पंखा भेट

मुंबई ता.१९: विरार पूर्व येथील एका अंगणवाडी च्या शाळेमध्ये लहान मुलांसाठी पंख्याची सोय नव्हती. तेथील स्थानिक महाराष्ट्र सैनिक कु. पुजा सोनावणे यांनी हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभववाडी तालुका सहसंपर्क अध्यक्ष श्री. सागर कुडाळकर यांना सांगताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत यांच्या शुभहस्ते अंगणवाडी शाळेमध्ये पंखा देण्यासाठी विरार च्या स्थानिक महाराष्ट्र सैनिक कु. पुजा सोनावणे यांच्या हातात सुपूर्द करण्यात आला. यावेळी वसई- विरार च्या महिला उपशहर अध्यक्षा सौ. अनुप्रिता ताई मेस्त्री, मनविसे वैभववाडी तालुका संपर्क सचिव ज्ञानेश्वर मोरे, सहसंपर्क अध्यक्ष श्री.विवेक कुडतरकर, सागर कुडाळकर, सुभाष काडगे, महाराष्ट्र सैनिक राजेश कनोजिया आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments