ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने लातूर येथे राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन

147
2

वैभववाडी ता.१९: ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने लातूर येथे राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था व लातूर जिल्हा शाखा यांच्यावतीने दिनांक २७ व २८ जुलै,२०१९ रोजी औषधी भवन, देशी केंद्र शाळेजवळ, सिग्नल कँम्प, लातूर येथे दोन दिवशीय राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचे आयोजन केलेले आहे.
यावेळी समग्र भारतीय ग्राहक चळवळ, कार्यकर्ता कसा असावा, प्रवासी ग्राहक, आँनलाईन खरेदी व ग्राहक संरक्षण कायदा, माहितीचा अधिकार , ग्राहकाभिमुख प्रशासन, ग्राहक चळवळीत महिलांचा सहभाग, रेरा अँक्ट व ग्राहक या विषयावर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बाबासाहेब जोशी यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सत्कार, ग्राहक जागरण फेरी व ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या जीवनावर आधारित फिल्म दाखवली जाणार आहे.
विशेष म्हणजे यावेळी अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेले उद्योजक, व्यापारी, शेतकरी, श्रमिक व ग्राहक यांचाही सत्कार केला जाणार आहे.
या अभ्यासवर्गाला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष डाँ.विजय लाड, संघटक श्री. सर्जेराव जाधव व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी केले आहे.

4