कणकवली पोलिसांची मध्यरात्री कारवाई
कणकवली : दि. 19 : गोव्याहून पुणे येथे जाणार्या नीता वोल्वो आराम बस मधून 14 हजार 500 रुपयांची गोवा बनावटीची दारू कणकवली पोलिसांनी जप्त केली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास कणकवली एस.एम.हायस्कूल येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी खासगी आराम बसचा क्लीनर रमेश श्रीदयाराम पाल (रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. बोरिवली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आराम बसमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची खबर कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आपल्या सहकार्यांसह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती. रात्री दीडच्या सुमारास गोव्याहून पुणे येथे जाणार्या नीता वोल्वो लक्झरी बसच्या (युपी-75 केटी 8888) या गाडीच्या सामान बॉक्स मध्ये गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. या अवैध दारू वाहतूक प्रकरणी कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी बसचा क्लीनर रमेश पाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार, कॉन्स्टेबल वैभव कोळी, चालक जमादार उबाळे यांच्या पथकाने कारवाई केली.