पालिकेचा प्रकल्प:महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज लोकार्पण…
सावंतवाडी ता.१९: येथिल महिलांना आता पाच रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहेत.त्यासाठी आवश्यक असलेले मशीन आज पालिकेकडून येथील फुल मार्केट परिसरातील स्वच्छता गृहात बसविण्यात आले.या मशीनच्या माध्यमातून पाच रुपये देऊन संबंधित गरजू महिला या सेवेचा लाभ घेऊ शकतात.शहरातील सर्व स्वच्छतागृहात ही मशीन बसविण्यात येणार आहे.दरम्यान
या सेवेचे आजपासून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,दिपाली भालेकर,दिपाली सावंत,शुभांगी सुकी,भारती मोरे,समृद्धी विर्नोडकर,आसावरी शिरोडकर,परवीन शेख,रसिका नाडकरणी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या मशीनमध्ये पाच रुपये टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन बाहेर येणार आहे.तर डिस्ट्रॉयर मशीनच्या माध्यमातून खराब झालेल्या नॅपकिनचे विघटन करण्यात येणार आहे.याचा फायदा येथील महिलांनी घ्यावा,जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर कोणतेही परिणाम होणार नाहीत,असे आवाहन सौ.कोरगावकर यांनी या प्रसंगी केले.