पोलिस भरती प्रक्रियेत आता बदल

2

औरंगाबाद,ता. १९ : पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतून पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यापूर्वी पुल अप्स आणि लांब उडीसाठी प्रत्येकी 20 गुण परीक्षांमध्ये देण्यात येत होते.

पूर्वीची शारीरिक चाचणी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी 100 गुणांची होती, ती आता 50 गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणी देण्यासाठी आता लेखी परीक्षा किमान 35 टक्के गुण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी लागणार आहेत.

त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरात प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:5 प्रमाणात शारीरिक चाचणी परीक्षेत पात्र ठरवण्यात येतील.
जुन्या शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी 5 किलोमीटर धावणे गरजेचे होते. मात्र आता केवळ 1600 मीटर धावावे लागणार आहे. याशिवाय महिलांसाठी 3 किलोमीटर धावल्यानंतर 25 गुण मिळायचे, मात्र आता 800 मीटर धावल्यानंतर 30 गुण मिळणार आहेत.

मात्र लेखी परीक्षा आधी न घेता शारीरिक चाचणी व्हावी, अशी पोलीस भरतीसाठीच्या इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. मात्र 2019 मध्ये होणारी पोलीस भरती या नव्या नियमानुसार होऊल. या नव्या पोलीस भरतीच्या नियमानुसार पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी, काही उमेदवार सुरुवातीला लेखी परीक्षेऐवजी शारीरिक चाचणी घेण्यावर ठाम आहेत.

8

4