शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा ओटवणे ग्रामपंचायतीकडून गौरव

130
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा, ता. १९ : ग्रामीण भागातुन सर्वसाधारण गटात शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या तसेच दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ओटवणे ग्रामपंचायतीकडून गुणगौरव करण्यात आला.
ओटवणे जि. प. प्राथमिक शाळा क्र.3 ची विद्यार्थीनी कु. श्रध्दा संतोष चिले हिने ग्रामीण सर्वसाधारण गटातून शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल तिचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच ओटवणे विद्यालयातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच उत्कर्षा गावकर,उपसरपंच उज्वला बूराण,ग्रामसेविका कदम, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, दिशा गावकर, सौ. गावकर, ओटवाणे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश गावकर संजय कविटकर, मुख्याध्यापिका संजीवनी गवस, मनोहर मयेकर, रमेश गावकर, बाबा मळेकर आदी उपस्थित होते.

\