सावंतवाडीत रुग्णालयात डायलेसिस व रक्त तपासणी यंत्राचे लोकार्पण

153
2

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून सुविधा

सावंतवाडी, ता. १९: येथील उपजिल्हा रुग्णालयाला शासकीय निधीतून देण्यात आलेल्या रक्त तपासणी व डायलेसिस यंत्र सेवेचे लोकार्पण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.श्री.केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रुग्णालयातील डॉक्टर सर्व कर्मचाऱ्यांनी केक कापून श्री.केसरकर यांचा वाढदिवस साजरा केला.
पालकमंत्री श्री.केसरकर यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातील लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.तर आपल्या वाढदिवसादिवशी जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी या उद्देशाने गरजू व गरिबांसाठी श्री.केसरकर व शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले होते.

4