नगरसेवक संदेश निकम यांच्यावर कारवाई करा 

2

वेंगुर्ले न.प. सभेत सदस्यांची मागणी

गटार खोदाई प्रकरणी सेना- भाजप वादाचे दर्शन

वेंगुर्ले : ता.१९
नगरसेवक संदेश निकम हे या सभागृहाचे सदस्य असतानाही त्यांनी वेंगुर्ले सुंदर भाटले ते एसटी स्टँड येथील गटार कामासंदर्भात सभागृहात या विषयावर चर्चा न करता कोकण आयृक्ताना निवेदन देवुन तक्रार केली. हा सभागृहाचा अपमान केला असल्याचा मुद्दा नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आज झालेल्या न. प. च्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. यावर न. प. सभागृहात गरमागरम चर्चा झाली. नगरसेवकानी संदेश निकमांवर कारवाईची मागणी केली असता नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी या विषयी विषेश सभा घेऊन चर्चा करून कारवाई केली जाईल असे सांगितले. दरम्यान या मुद्यावरून सभागृहात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.
वेंगुर्ले न. प. ची सर्वसाधरण सभा शुक्रवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली न. प. च्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर,  तूषार सापळे, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, सुमन निकम, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, विधता सावंत, प्रकाश डिचोलकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे मुख्याधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते. प्राप्त अंदाजपत्रकांना मंजुरी देणे हा विषय चर्चेस आला असता सुमन निकम यानी शहरातील हॉटेल बाबू समोर न. प. ने केलेल्या गटार खोदाईमुळे तेथील दुकानदार व नागरीकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आणुन हे काम कधी मंजुर करण्यात आले होते. असा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी यानी आबा भगत यांच्या घरापर्यतच गटाराचे काम मंजुर करण्यात आले होते. मात्र तेथील मोरी तुंबल्यामुळे पुढे पाणी जाण्यासाठी गटार खोदाई करण्यात आली. हे करीत असताना बांबू हॉटेलचे मालकांनी त्याला विरोध केला होता. त्यांची भिंत पडली तीही अनधिकृत होती असे सांगितले. या विषयावर नंतर  जोरदार चर्चा खडाजंगी झाली. निकम यांनीच पालकमंत्री यांच्या मार्फत हे काम मंजूर करून आणले, असे सुहास गवंडळकर यांनी सांगितले.मात्र गटारातील पाणी वाहून जाण्यासाठी जे काम होते ते न.प.ने केले, पण अनधिकृत बांधकाम केलेल्यांचा विचार नाही केला असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रशांत आपटे यांनी संदेश निकम हे या सभागृहाचे सदस्य असतानाही त्यांनी या सभागृहात या विषयावर चर्चा न करता कोकण आयृक्ताना निवेदन देवुन तक्रार केली हे योग्य नाही. हा सभागृहाचा अपमान केलेला आहे. यावर न. प. सभागृहात खडाजंगी होऊन नगरसेवकानी  संदेश निकमांवर कारवाईची मागणी केली असता नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी या विषयी विषेश सभा घेऊन चर्चा करून कारवाई केली जाईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक तुषार सापळे यांनी हे प्रकरण वाढउया नको असे सांगून सभागृहाची हात जोडून माफी मागितली. आम्ही सर्व सत्ताधारी गटातील आहोत, निकम शिवसेनेचे सदस्य आहेत त्यामुळे विषय इथेच थांबुया असे सांगितले. परंतु अन्य सदस्य कारवाईसाठी आग्रही राहिले.
वेंगुर्ले शहराचा पर्यटन व सर्वांगीण विकास होण्यासाठी वेंगुर्ले शहर विकास आराखडयातील जूना एस. टी. स्टॅण्ड ते नारायण तलाव रस्ता, नाथ पै रस्ता ते भराडी मंदीर रस्ता, गाडीअड्डा चौक ते दाभोली नाका रस्ता, हॉिस्पटल नाका, व भटवाडी हि रस्ता रुदीकरणाची कामे उपलब्ध निधीतून करण्याचे, व हि कामे करीत असताना हॉस्पिटल नाका व भटवाडी रस्ता या कामांना प्राधन्यक्रम देण्याचे या वेळी ठरविण्यात आले. या सह अन्य विषयांवर चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.

 

19

4