आंबोलीत टेम्पो ट्रॅव्हलर व अल्टोत अपघात

524
2

सावंतवाडीतील पाचजण जखमी : इचलकरंजीतील दोघांचा समावेश

आंबोली, ता. 19 ः टेम्पो ट्रॅव्हलर आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत सावंतवाडीतील पाच तर इचलकरंजीतील दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात आंबोली-फणसवाडी येथे सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यात अल्टो कारचा चक्काचूर झाला आहे.
परेश लक्ष्मण बावकर, रुपेश विष्णू कावले, अभिजीत मनोहर बावकर, गोपाळ शशिकांत नाईक व अमोल नाईक (सर्व रा. सावंतवाडी) हे जखमी झाले आहेत. त्यात अभिजीत बावकर यांच्या पायाला तर रुपेश यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधील अश्विनी दत्ताराम मगदूम, पद्मिनी तानाजी दिंडे (दोघे रा. इचलकरंजी) हे जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले व तेथून सावंतवाडीत हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी अदिती पाटकर यांनी दिली.

4