माजगाव डिके हॉल समोरील कपड्यांचा सेल मध्ये चोरी

423
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.२०:
माजगाव गुलाबी तिठा परिसरात सुरू असलेल्या कपड्यांच्या सेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यात सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री घडली. आज सकाळी दुकान उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. याच एक ते दीड लाखांचे कपडे चोरीस गेले आहे. अज्ञात चोरट्याने खिडकीमधून मुद्देमाल चोरला.याबाबतची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य बाबू सावंत व सरपंच दिनेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पंचनामा यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.