बंदर विकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन
वेंगुर्ले ता.२०: भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले च्या वतीने उभादांडा ग्रामपंचायत हद्दीत नवाबाग वाडी मध्ये उर्वरित समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा व्हावा याकरिता बंदर विकास राज्य मंत्री मान.रविंद्रजी चव्हाण यांना तालुक्याच्या वतीने प्रदेश चिटनीस राजन तेली व प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
नवाबाग वाडी मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उर्वरित समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमहोदयांचे याकडे लक्ष वेधून निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा चिटनीस साईप्रसाद नाईक , नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर , नगरसेवक प्रशांत आपटे यांच्यासह पदधिकारी उपस्थित होते.