करिअर घडविण्यासाठी डिजीटल नॉलेज गरजेचे

231
2

हर्षद चव्हाण : सावंतवाडीत करिअर मार्गदर्शन शिबीर

सावंतवाडी, ता. २० : महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअर निवडण्यासाठी तसेच एमपीएससी आणि युपीएससीसारख्या स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी डिजीटल नॉलेज महत्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी आता आधुनिक शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन येथील माया एंटरप्रायझेसचे संस्थापक हर्षद चव्हाण यांनी आज येथे केले.
माया एंटरप्रायझेस आणि ब्रेकींग मालवणी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे ग्रॅज्युएशननंतर काय हे करिअर गाईंडन्स शिबीर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुधीर नाईक, हर्षदा चव्हाण, महिंद्रा क्लासेसचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये टॅलेंट भरलेले आहे. परंतू त्यांना यथोचित मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे ग्रॅज्युएशननंतर पुढे काय असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. मात्र मुलांना शासकीय नोकर्‍या मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले कॉम्प्युटर कोर्सेस आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. यात मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड आदी शिक्षणासमवेत उच्च नोकर्‍यांची संधी देणार्‍या कोर्सचा समावेश आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. श्री. नाईक म्हणाले, या ठिकाणी करिअर गाईंडन्ससारखे शिबीर मोफत आयोजित करून युवापिढीला दिशा देण्याचे काम माया एंटरप्रायझेसच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेवून भविष्यात चांगली नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

4