बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हा संघटक पदी नीलम शिंदे, संजना हळदिवे यांची निवड…

2

वर्षा कुडाळकर ; ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे निश्चितच खाते उघडेल…

मालवण, ता. ०३ : बाळेसाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण- कुडाळ विभागासाठी उपजिल्हा प्रमुख संघटक पदी नीलम शिंदे तर कणकवली- वैभववाडी विभागासाठी संजना हळदिवे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आज येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हा संघटक वर्षा कुडाळकर यांनी जाहीर केली.

येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, अनघा रांगणेकर, रत्नाकर जोशी, जयदीप तुळसकर, किसन मांजरेकर, पराग खोत, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर, भारती घारकर, लुड्डीन फर्नांडिस, रिया आचरेकर, गीता नाटेकर, निकिता तोडणकर, कविता मोंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सौ. कुडाळकर म्हणाल्या, येत्या महिना अखेर जिल्ह्यातील उर्वरित पदांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. जी कार्यकर्ती पक्षासाठी वेळ देऊ शकते. पक्षासाठी काम करण्याची तळमळ, उर्मी असणाऱ्या तसेच पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचीच पदाधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे. पक्षाला जिल्ह्यातील गावागावात वाढता प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पक्षाने सरपंच, सदस्य पदाचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे कुडाळ- मालवण मतदार संघातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खाते निश्चितच उघडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

367

4