Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत 'माझा वेंगुर्ला’ तर्फे २८ जुलैला ‘उत्सव रानभाज्यांचा’ कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्लेत ‘माझा वेंगुर्ला’ तर्फे २८ जुलैला ‘उत्सव रानभाज्यांचा’ कार्यक्रमाचे आयोजन

भव्य प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धा खास आकर्षण

वेंगुर्ले : ता.२०:माझा वेंगुर्ला’ तर्फे रविवार २८ जुलै रोजी साई मंगल कार्यालय येथे दुपारी २.३० ते ६ या वेळेत ‘उत्सव रानभाज्यांचा’ कार्यक्रम आयोजित केला असून यात पावसाळ्यात उगवणाऱ्या दुर्मिळ रानभाज्यांच्या जतन व संवर्धनासाठी भव्य पाककृती स्पर्धा, प्रदर्शन व विक्री होणार आहे.
वर्षा ऋतूच्या आगमनाबरोबर कोकणातल्या जंगल, दऱ्याखोऱ्यात उमलून येणाऱ्या असंख्य रानभाज्यांची पारंपारीक महती, दुर्मिळ रानमोडी चव असते. पावसाच्या आगमना सोबत खवय्यांना उत्सुकता असते ती कोकणातल्या या दुर्मीळ औषधी आणी रानमोळी चवदार रानभाज्यांची. याच अल्पपरिचीत रानभाजाचे औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती याची माहिती युवापिढील होण्यासाठी माझा वेंगुर्ला मार्फत सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविला जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने वसुंधरा विज्ञान केंद्र आणि बायफ रिसर्च फाऊंडेशन पुणे व कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून या रानभाज्यांची ओळख, माहिती व संवर्धन असे कार्यक्रमाचे आयोजन असून वनश्री प्रा. बाळकृष्ण गावडे हे मार्गदर्शन करणार आहेत. फक्त ६० स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गृहिणी, महिला बचतगट, निसर्गप्रेमी यांनी २७ जुलैपर्यंत आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
उत्सव रानभाज्यांच्या या कार्यक्रमा दरम्यान आयुर्वेचार्य डॉ. सुविनय दामले यांच्या सोबत निसर्गातील रानभाजी तसेच औषधी वनस्पती ओळखण्यासाठी जंगल सफरीचे आयोजन २ ऑगस्ट रोजी सांय ६ वाजता करण्यात आले आहे. तरी अधिक महितीसाठी व नावनोंदणीसाठी राजन गावडे (९४२३३०१३१०), निलेश चेंदवणकर (९४२२९६४४१६), खेमराज (८४२१६९९७९७) कपिल पोकळे (७२७६६८८७७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माझा वेंगुर्ला तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments