सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने वधू-वर नोंदणीचा मालवणात शुभारंभ…

2

मालवण, ता. ०३ : सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने ज्ञाती बांधवांसाठी वधू-वर नोंदणीचा शुभारंभ आज तालुका भंडारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात करण्यात आला.

यावेळी प्रथम आलेल्या वराच्या नोंदणीचा शुभारंभ आचऱ्याचे उद्योजक जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वधू-वर नोंदणीच्या फलकाचे अनावरण आशीर्वाद कॅटरर्सचे मालक मोहन वराडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, कार्यवाह पंकज पेडणेकर, भंडारी पतसंस्थेचे संचालक राजीव आचरेकर, सागर हडकर, सचिन आरोलकर, भूषण मयेकर, विनोद बिलये, सौ. रसिका तळाशीलकर, अश्विनी वायंगणकर, सौ. वराडकर, सुशील शेडगे, अजित गवंडी, सचिन गवंडी आदी मान्यवर, वधूवरांचे पालक उपस्थित होते. सुशील शेडगे यांनी आभार मानले.

216

4