ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांची खरी ताकद दाखवून द्या…

3
2
Google search engine
Google search engine
Google search engine

खासदारांचे आवाहन; विक्रांत सावंतांसह गावडे, कासारांकडे सावंतवाडीची जबाबदारी…

सावंतवाडी,ता.०३: कोणी कुठेही गेले तरी शिवसेनेची ताकद आणि निष्ठावान सैनिक आहेत तिथेच आहे, त्यामुळे येणार्‍या काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकात शिवसेनेची ताकद दाखवून द्या, असे आवाहन आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केले. तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडुन मोर्चे बांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज कोलगाव येथे श्री. राऊत यांच्या उपस्थितीत आज बैठक घेण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुक्याची जबादारी सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्यासह बाळा गावडे, चंद्रकांत कासार व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे देण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, अतुल रावराणे, जान्हवी सावंत, रुची राऊत, रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, आबा सावंत, योगेश नाईक, नामदेव नाईक, गुणाजी गावडे, संजय कानसे, संदिप माळकर, राजू शेटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

\