भालचंद्र महाराज संस्थान अध्यक्षपदी सुरेश कामत यांची फेरनिवड

2

कणकवली, ता.२०:  शहरातील भालचंद्र महाराज संस्थान कणकवली या संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश कामत यांची फेरनिवड झाली आहे. संस्थानच्या सर्वसाधारण सभेत पाच वर्षाच्या कालावधीकरिता कार्यकारी मंडळ व सल्लागार समितीची निवड करण्यात आली.
नव्या कार्यकारीणीमध्ये खजिनदारपदी गोविंद यशवंत नार्वेकर, सेक्रेटरी अशोक विनायक सापळे तर सभासद म्हणून सदानंद विठ्ठल बाउस्कर, श्रीकृष्ण राजाराम सापळे, मुरलीधर विष्णू नाईक, सखाराम मारूती अंधारी, निवृत्ती सुरेश धडाम, राजाराम दत्तात्रय बारस्कर (ठाणे), अनंत बाळकृष्ण सौदागर (मुंबई), विश्‍वनाथ काशिनाथ जेठे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली. तर सल्लागार समितीवर गौतम एकनाथ ठाकूर (मुंबई), अशोक आत्माराम बागवे (मुंबई), शिवानंद श्रीधर रेवंडकर (काळसे), सुहास जगन्नाथ पालव (कणकवली), पांडुरंग तुकाराम देसाई (मुंबई), शशिकांत नारायण परब (मुंबई), प्रसिद्धी माध्यम सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार माधव रामचंद्र कदम (कणकवली), उदय मनोहर आळवे (कणकवली), उमेश सहदेव वाळके (कणकवली), कायदेविषयक सल्लागारपदी अ‍ॅड. राजेंद्र विश्राम रावराणे, डॉ. सुर्यकांत नारायण तायशेटे, गजानन भालचंद्र उपरकर, मनोज भालचंद्र मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.

4