देवलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

177
2

मालवण, ता. २० : तालुक्यातील देवली ग्रामपंचायतीच्यावतीने चौदावा वित्त आयोग योजनेतंर्गत प्राथमिक शाळा खालची देवली येथे २१ जुलैला सकाळी १० वाजता मोफत आरोग्य शिबिर भरविण्यात आले आहे.
या शिबिरास जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, माजी सभापती मनीषा वराडकर, सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण, ग्रामसेविका वेदिका गोसावी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
तपासणी शिबिरात हिमोग्लोबीन, मधुमेह, रक्तदाब व इतर तपासणी, नेत्र तपासणी होणार आहे. डॉ. पांडुरंग साईल, डॉ. श्रद्धा परब-साईल, विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्याकडून या तपासण्या होणार आहेत. ४५ वर्षावरील रुग्णांना मोफत चष्मा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गणेशभक्त कोकणवासी प्रवासी संघ मुंबई, आम्ही मैत्रिणी प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून मोफत उपचार होणार आहेत. महाराष्ट्र उद्योग मंदिर लालबाग यांच्यावतीने चष्मा, मोफत औषधे दिली जातील. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

4