दोडामार्ग हेल्पलाइनचा आरोप पोलिसात तक्रार दाखल
दोडामार्ग, ता. २० : शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडून आपल्या पदाचा व व सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे, असा आरोप करत त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका आहे अशी तक्रार दोडामार्ग येथील हेल्पलाइन ग्रुपच्यावतीने आज पोलिसात करण्यात आली. याबाबत पोलिसांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी रवींद्र खडपकर, कानू दळवी, प्रकाश गवस, राजू ठाकुर, आनंद तळणकर, वैभव इनामदार, गौरेश टोपले, विवेक भिसे, संजय सातार्डेकर, बाळा गवस आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, तालुक्यात अपेक्षित असण्याऱ्या विकास कामांची चर्चा केली या रागातून तालुकाप्रमुख धुरी यांनी सेना स्टाईलने उत्तर देऊ व परिणामांना सामोरे जावे लागेल अशा धमकीचे वक्तव्य सोशल मीडियावर केले होते. दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार करून हेल्पलाईन ग्रुप बंद करावा अशी मागणी केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. धुरी हे आपल्या सत्तेचा आणि नेत्यांच्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करीत आहेत.