कुर्ली टेंबवाडी येथील राघोबा पाटील यांचे स्वातंत्र्यदिनी करण्यात येणारे उपोषण मागे
वैभववाडी, ता. २० : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कुर्ली टेंबवाडी येथील पायवाटेचा प्रश्न अखेर तहसिलदार रामदास झळके यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून सामोपचाराने सोडविला. त्यामुळे राघोबा पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी रस्त्यासाठी करण्यात येणारे उपोषण मागे घेतले.
यावेळी नायब तहसिलदार गमन गावीत, सरपंच दर्शना पाटील, उपसरपंच अंबाजी हूंबे, विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, मंडळ अधिकारी एस. बी. यादव, अनंत पिळणकर, ग्रा. पं. सदस्य सुरज तावडे, पो. पो. प्रदिप पाटील, राघोबा पाटील, कृष्णा पाटील, विकास पाटील, रमेश पाटील, सत्यवान पाटील, तलाठी ए. एस. जयानवर, ग्रामसेवक आर. ए. गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार झळके यांनी राघोबा पाटील यांच्या १५ अॉगस्टदिनी होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. रस्ता ही प्रत्येकाची गरज आहे. कोणी कोणाचा रस्ता अडवू नये. गावच्या विकासासाठी सर्वांनी आपआपसातील अडचणी सामोपचाराने दूर करून गावच्या विकासात हातभार लावावा. असे आवाहन केले.
राघोबा पाटील यांच्या घराकडे जाणाऱ्या पायवाटेसाठी संबंधित शेतकऱ्यांनी जमिन देण्याचे मान्य केले. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न तहसिलदारांच्या मध्यस्थीने सुटल्याने ग्रामस्थानीही समाधान व्यक्त केले.