पत्नी गंभीर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
कणकवली, ता. २० : तालुक्यातील कनेडी येथे रमेश कृष्णा देसाई याने आपली पत्नी रत्नावती रमेश देसाई हिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. हातावर आणि छातीवर केलेल्या हल्ल्यात रत्नावती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पती व पत्नीत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. यातच रागाच्या भरात घरातील कोयत्याने रत्नावतीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रत्नावती गंभीर जखमी झाली. तिच्यावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी रत्नावतीचा मुलगा बाळकृष्ण याने फिर्याद दिली आहे. हल्लेखोर रमेश देसाईवर भा. दं. वि. 307 व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.