हायवे उपअभियंता चिखलफेक प्रकरणी अन्य 11 आरोपींपैकी 7 आंदोलकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

268
2
Google search engine
Google search engine

चौघांचा अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली, ता.२० : 4 जुलै रोजी कणकवलीत हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर याना चिखलफेक करत मारहाण करण्यात आली होती. या गुन्ह्यात आमदार नितेश राणेंसह एकूण 19 आंदोलकांना अटक करण्यात आली होती.5 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आमदार नितेश यांच्यासह सर्व 19 आंदोलकांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. याच प्रकरणात कणकवली पोलिसांनी आणखी 11 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते.
या 11 आंदोलकांच्या अटकपूर्व जामिनावर जिल्हा न्यायालयासमोर १९ जुलै रोजी सुनावणी झाली होती. सुनावणीअंती जिल्हा न्यायालयाने सिद्धेश प्रकाश वालावलकर, औदुंबर चंद्रकांत राणे, लवु रामचंद्र परब, संजीवनी संजय पवार यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर राकेश प्रल्हाद परब, जावेद रशीद शेख, अजय अनंत गांगण, सुशील शांताराम पारकर, उपेंद्र विलास पाटकर, समीर विलास प्रभुगावकर, शामसुंदर नारायण दळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.