जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून अरुणा प्रकल्पग्रस्तांची पाहणी

2

सिंधुदुर्गनगरी, ता.२०: जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज अरुणा प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. तसेच अरुणा प्रकल्पामध्ये झालेल्या पाणीसाठ्याचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, वैभववाडीचे तहसिलदार श्री. झळके, अरुणा प्रकल्पाचे उप अभियंता श्री. माणगांवकर, सहाय्यत अभियंता श्री. दावणे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी मोजे आखवणे, गुरववडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच मौजे मौदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन मुडीत क्षेत्रात गेलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना चांगला प्रतिसाद दिला. तसेच मौजे मौदे पर्यंत झालेल्या पर्यायी रस्त्याची पाहणीही केली व त्याबाबत अरुणा प्रकल्प उपअभियंता श्री. माणगांवकर यांना योग्य त्या सूचना दिल्या.

1

4