वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 112.4 मि.मी. पावसाची नोंद

159
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता.२०:  वेंगुर्ला तालुक्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक 112.4 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरसारी 48.67 मि.मी पाऊस झाला असून 1 जून 2019 रोजी पासून आजपर्यंत एकूण 1708.10 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 42 (1856), सावंतवाडी 13 (1400), वेंगुर्ला 112.4 (2106.84), कुडाळ 06 (1641), मालवण 98 (1452), कणकवली 9 (1925), देवगड 90 (1357), वैभववाडी 19 (1927) पाऊस झाला आहे.

\