सायकल रॅली चे वेंगुर्ले शिवसैनिकांतर्फे स्वागत

2

 

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजन

वेंगुर्ले : ता.२१: शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या सायकल रॅली चे स्वागत वेंगुर्ला बंदर या ठिकाणी वेंगुर्ले शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले.
सावंतवाडी येथून ही रॅली काढण्यात आली. ५०कि.मि. व १०० कि. मि. अंतराच्या या रॅली मध्ये वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाड़ी येथील नामवंत डॉक्टर, वकील, उद्योगपती, सायकलपटु सहभागी झाले होते. वेंगुर्ले येथे ही रॅली आल्यावर त्यांचे शिवसेने तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, अशोक दळवी, प.स. सभापाती सुनील मोरजकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला आघाडी तालुका संघटक सुकन्या नरसुले, शहरप्रमुख विवेक आरोलकर, उपशहरप्रमुख अभिनय मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, महिला आघाडी शहर संघटक मंजुषा आरोलकर, उपतालुका प्रमुख संजय गावडे, हेमंत मलबारी, नितीश कुडतरकर, राहुल नरसाळे व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

1

4