अर्चना घारे-परब;भव्य भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा सावंतवाडीत शुभारंभ
सावंतवाडी ता.२१’:तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक लोककला संपुष्टात येत असताना सुद्धा काही तरुण पिढी या कला जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यात संत वांग्मयावर आधारित भजन कलेचा सुद्धा समावेश आहे.अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अर्चना फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदैव पाठीशी राहू,असे प्रतिपादन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांनी आज येथे केले.खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य भजन स्पर्धेच्या सावंतवाडी तालुकास्तरीय प्राथमिक फेरीचा शुभारंभ आज येथील विठ्ठल मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सध्या गावागावात अशा भजन स्पर्धा घेतल्या जात आहेत.या भजन स्पर्धांच्या माध्यमातून आपली लोककला जोपासली जात आहे.त्यात खारीचा वाटा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचेही सौ.घारे यांनी सांगितले.तर आताची तरुण पिढी हे उद्याचे भवितव्य आहे.त्यामुळे तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अर्चना फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत राहू असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थितांना दिले.
या स्पर्धेत तालुक्यातील एकूण बावीस संघांनी सहभाग घेतला होता.तर दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातही या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे.यात निवडक भजन संघांची अंतिम फेरी येथील नाथ पै सभागृहात होणार आहे.अशी माहिती यावेळी सौ.घारे यांनी दिली.
यावेळी ऍड.दीपक नेवगी, विधानसभा अध्यक्ष एम.डी.सावंत,संदीप घारे. पुंडलिक दळवी,प्रदेश प्रतिनिधी उदय भोसले,डॉ.संजीव लिंगवत,भालावल तंटामुक्त अध्यक्ष रमेश परब,निलेश मेस्त्रीं,परीक्षक नारायण असोलकर आदींसह मोठ्या संख्येने स्पर्धक व भजन रसिक उपस्थित होते.