निमअरुळेतील वृध्दाचा वैभववाडीत मृतदेह आढळला

2
  1. वैभववाडी ता.२१: तालुक्यातील निमअरुळे येथील रमेश शंकर कदम वय ६० वर्षे यांचा येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत रामचंद्र पांडुरंग कदम यांनी घटनेची माहिती पोलिसात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
    याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी रामचंद्र कदम यांना रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या इसमाने रमेश कदम वैभववाडी स्टेट बँकेच्या शाखेसमोर पडले आहेत. तुम्ही येवून खात्री करा असे सांगितले. दरम्यान रामचंद्र कदम यांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता त्यांची काहीच हालचाल होत नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलग्याला याबाबत कळविले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला आहे.
4