कळणे मायनिंगची चौकशी करून कारवाई न केल्यास १५ ऑगस्टला राजभवनासमोर लाक्षणिक उपोषण छेड़णार*

272
2
Google search engine
Google search engine

कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडलाचा इशारा

दोडामार्ग, ता. २१ :  दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात कित्तेक वर्षे सुरु आलेल्या मायनिंग मानवी जीवना बरोबर पर्यावरणास धोका बनला आहे. काही महिन्या पूर्वी याच मायनिंग वर 1एका ऑपरेटर ला आपाला जीव गमवावा लागला परंतु जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. येत्या ९ ऑगस्ट पर्यंत यावर कार्यवाही नझाल्यास मुंबई येथे १५ ऑगस्ट ला थेट राजभवना समोर लाक्षणिक साखली उपोषण करण्यात येईल अशी माहिती कळणे पंचक्रोशि शिक्षण प्रसारक मंडलाचे सस्थाध्यक्ष प्रा. मोहनराव देसाई यांनी प्रसिद्धि पत्रका द्वोरे दिली आहे.
कळणे मायनिंगचा मानवी जीवना बरोबरच पर्यावरणावरही विपरीत परिणाम होउ लागला आहे. काही दिवसांपूर्वी जो एका ऑपरेटराचा बळी गेला त्याला खनिकर्म विभाग जबाबदार असून जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यावर खुनास कारणीभूत असल्याबाबतचा गुन्हा दाखल करावा तसे झाले तरच बेसुमार उत्खननास आळा बसेल व भविष्यात होणारे अनर्थ टळतिल अशी मागणी कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडलाने दोन महिन्या पूर्वी केली होती. तसेच सबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबर मुखमंत्र्याचे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले होते.
निसर्ग संपन्न कळणे गावात मायनिंग सारख्या राक्षसाला स्थान असू नये ही भूमिका समस्त कळणे वासियांची सुरवातिपासुनच होती. महाराष्ट्रात कधी नव्हे असे मायनिंग विरोध करणारे अभूत पूर्व आंदोलन झाले. या आंदोलनाची दखल महाराष्ट्रा बरोबरच देशातील जनतेने घेतली शासनाने मात्र हा विनाशकारी प्रकल्प कळणे वासियांच्या पर्यायाने दोडामार्ग तालुक्याच्या माथि मारला. या विनाशकारी प्रकल्पाचे दुष्परिणाम समोरयायला सुरवात झाली राक्षशी पद्धतीने उत्खनन चालू राहिल्यास धोक्याची तीव्रता आणखी वाढणार असे पत्रकात म्हटले आहे.
*मुख्यमंत्री राज्यपाल यांनी कारवाईचे आदेश द्यावेत*
कळणे ठिकाणच्या मायनिंग प्रकल्पात सातत्याने होणारे नियम बाह्य काम, कंपनीचे मालक व अधिकारी यांच्या संगनमताने होत असणारे बेसुमार उत्खनन धोक्यात आलेली पारंपरिक शेती, सर्वत्र धुलीचे साम्राज्य, तसेच दिवसे दिवस वाढते अपघात या सर्व बाबीनची दखल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस व राज्यपाल मा. सी. विद्यासागर यांनी घेऊन सम्बंधित दोषिवर योग्य ति कठोर कारवाई करावी. त्याच प्रमाणे या प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.